Tap to Read ➤
स्वामी समर्थ महाराजांना नवस करायचा विचार आहे? ‘हे’ नियम पाळायलाच हवे
स्वामी समर्थ महाराज मनातील इच्छा लगेच पूर्ण करतात, अशी अनेकांची श्रद्धा आहे.
अनेकदा कितीही प्रयत्न केले तरी एखादी गोष्ट पूर्णच होत नाही. अडीअडचणी थांबत नाहीत.
प्रयत्न निष्फळ ठरून पदरी काहीच पडत नाही, तेव्हा आराध्य देवतेकडे मनापासून मागणे मागितले जाते. अनेकदा नवसही बोलले जातात.
स्वामी समर्थ महाराज इच्छा पूर्ण करतात. भक्तांच्या हाकेला धावून जातात. अडचणींतून सोडवतात, अशी अनेकांची श्रद्ध आहे. अनेकांना तसे अनुभवही आले आहेत.
ब्रह्मांडनायक स्वामी समर्थ महाराजांना नवस करण्याची इच्छा असेल तर तो कसा करावा? नियम काय आहेत? ते पाहुया...
अगदी घरच्या घरी स्वामींना नवस केला जाऊ शकतो. यासाठी मोठी पूजा करावी, होम-हवन करण्याची गरज नाही, असे म्हटले जाते.
स्वामींसमोर बसा. घरातील स्वामींची मूर्ती किंवा तसबिरीसमोर दिवा, अगरबत्ती लावा. स्वामींची मनापासून प्रार्थना करा.
स्वामींसमोर हात जोडून तुमचे जे काही मागणे आहे, हे मागा. संकटे, समस्यांची गाऱ्हाणी मांडा. नवस बोलायचा आहे, तो बोलून घ्या.
स्वामींना प्रार्थना करावी की, स्वामी समर्थ महाराजा हा नवस आहे, तो शक्य तितक्या लवकर पूर्ण व्हावा. स्वामींसमोर नतमस्तक व्हा.
तसेच जे शक्य आहे, ते यथाशक्ती करण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल, असा आश्वासित शब्द द्या.
स्वामींकडे मागितलेली गोष्ट पूर्ण झाली, तर नवस फेडण्यासाठी शक्य असेल तर अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घ्या.
महत्त्वाचे म्हणजे एकदा नवस बोलला आणि तो फळला तर जे काही वचन दिले आहे, ते पूर्ण करायला अजिबात विसरू नका.
नवस फेडण्याचा विलंब करू नका. अन्यथा अडचणी, समस्यांना सामोरे जावे लागू शकते. स्वामी दयाळू असले तरी ही गोष्ट चुकवू नका.
केवळ नवस बोलून भागणार नाही. प्रयत्नांची पराकाष्टा करायला हवी. तुमच्या प्रयत्नांना, कृतींना स्वामीबळ, गुरुकृपेची साथ लाभू शकेल.
स्वामीसेवा सुरू ठेवा. सदर दाव्यांची पुष्टी केली जात नाही. ही माहिती सामान्य गृहितकांवर आधारित असून, अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
क्लिक करा