Tap to Read ➤

तुमचं Wi-Fi Router किती वीज खातं? ‘अशी’ करा बचत

वर्क फ्रॉम होममुळे WiFi सुरु असतं. ही खर्च होणारी वीज कशी वाचवाल?
वर्क फ्रॉम होमचे कल्चर वाढत आहे. आता ऑफिसऐवजी घरुनच काम करण्यावर अनेक कंपन्या भर देत आहेत.
अशा परिस्थितीत त्यांना वेगवान इंटरनेटची सर्वाधिक गरज असते. यासाठी घरोघरी वाय-फाय राउटर बसवले जाते.
घरात वायफाय राउटर जवळपास दिवसभर सुरू असते. शिवाय त्याला कम्प्युटर, लॅपटॉप, मोबाइल जोडलेले असते.
वायफाय राउटर किती वीज वापरतो हे तुम्हाला माहिती नसेल. राउटरचा विजेचा वापर त्याच्या स्पेक्स, वापराचा वेळ, अन्य घटकांवर अवलंबून असतो.
वायफाय राउटर वीज रेटिंग, वापराच्या पद्धतीनुसार प्रति तास ६ ते २० वॅट पॉवर वापरतो. हे राउटर ५ ते २० वॅट्सचे असतात.
राउटर दिवसाचे २४ तास सतत वापरात असेल तर, प्रति तास १० वॉट प्रमाणे ७३० किलोवॅट वीज वापरतो, असे म्हटले जाते.
वीजबिल येते तेव्हा त्यात एकूण रक्कम दिसते. कोणते उपकरण किती वीज वापरते, याचा उल्लेख बिलात येत नाही.
मात्र, वायफाय राउटरमधून खर्च होणारी वीज वाचवली जाऊ शकते. यासाठी काही उपाय सांगितले जातात.
घरात वायफाय इन्स्टॉल केले असल्यास, अनावश्यक किंवा अनोळखी डिव्हाइसेस मर्यादित करा.
वायफाय पासवर्ड संरक्षित करा. अधिक उपकरणे कनेक्ट केल्याने राउटरवर दबाव वाढू शकतो. याने वीज जास्त वापरली जाते.
आपल्याला गरज नसताना अॅडॉप्टरसह वायफाय राउटर बंद करा. वायफाय राउटर तुमच्या डिव्‍हाइसजवळ ठेवा.
लांब अंतरावरील डिव्हाइस कनेक्टिव्हिटीसाठी वायफाय राऊटर अधिक कार्यरत होते. त्यासाठी अतिरिक्त वीज वापरली जाऊ शकते.
तुमच्याकडे फक्त एक कनेक्शन असल्यास, तुमची LAN केबल थेट तुमच्या PC/Laptop वर वापरा.
जेवढा वायफाय राउटरवर येणारा भार कमी, तेवढी वीज खर्च होण्याचे प्रमाण कमी होऊ शकते, असे सांगितले जाते.
क्लिक करा