भारताच्या शेजारील राष्ट्र पाकिस्तानात जवळपास ५२ लाख हिंदू समाज आहे
पाकिस्तानचं नाव ऐकताच सर्वात आधी तिथला दहशतवाद आणि गरिबी समोर येते. तिथे अल्पसंख्याक हिंदूंवरील अत्याचार ऐकायला मिळतात.
पाकिस्तानातील सर्वात जास्त हिंदू सिंध प्रांतात राहतात. जिथे एकट्या हिंदूंची लोकसंख्या ४९ लाखच्या आसपास आहे.
दीपक पेरवानी हे पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत हिंदू मानले जातात. १९७४ साली मीरपूर येथील सिंधी कुटुंबात त्यांचा जन्म झाला.
जगातील सर्वोत्तम फॅशन डिझाइनरमधील एक असलेले दीपक पेरवानी अभिनयातही काम करतात. १९९६ पासून दीपकनं करिअरला सुरुवात केली होती.
पाकिस्तानसह जगातील अनेक देशात दीपक पेरवानी यांना फॅशन डिझाइनर क्षेत्रात अनेक पुरस्कारांसाठी सन्मानित करण्यात आले आहे.
जगातील सर्वात मोठा कुर्ता बनवण्याचा रेकॉर्ड दीपक पेरवानी यांच्या नावावर आहे. जावेद अख्तर यांच्यासोबतही त्यांनी काम केले आहे.
दीपक पेरवानी यांची एकूण संपत्ती ७१ कोटी इतकी आहे. पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत हिंदू म्हणून त्यांना ओळखले जाते.