Tap to Read ➤
मुलांनी तुमचा आदर करावा तर शिकवा ८ गोष्टी
लहान वयापासूनच काही गोष्टी मुलांमध्ये रुजवाव्या लागतात
मुलांनी आपल्या पालकांचा आदर करावा तर त्यांना वाढवताना काही गोष्टी आवर्जून शिकवायला हव्यात.
मुलांच्या मनात लहान वयापासून सहानुभूतीची भावना जागृत करुन द्यायला हवी.
मुलांनी आपले विचार आणि भावना पालकांकडे व्यक्त करावेत यासाठी त्यांना संवाद कौशल्य शिकवायला हवे.
पालक मुलांसाठी करत असलेले कष्ट आणि त्याग या गोष्टीबाबत मुलांना कृतज्ञता वाटायला हवी.
मुलांना आपल्या कृतींची जबाबदारी घ्यायला शिकवले तर त्याचे परीणाम नकळत त्यांना पालकांचा आदर करायला लावतील.
मुलांना नियम आणि मर्यादा घालणे अतिशय आवश्यक असते, त्यामुळे त्यांच्यात नकळत आदराची भावना वाढते.
मुलांमध्ये सहनशक्ती वाढावी यासाठी पालकांनी आवर्जून काही गोष्टी करायला हव्यात.
नम्रता हा व्यक्तीमधला अतिशय महत्त्वाचा गुण असून मुलांना नम्रता शिकवल्यास ते नकळत आदर करायला शिकतात.
स्वातंत्र्य ही अतिशय महत्त्वाची गोष्ट असून मुलांना पुरेसे स्वातंत्र्य असेल तर त्यांना आपल्या क्षमतांची ओळख होण्यास मदत होते.
क्लिक करा