Tap to Read ➤

एसी घ्यायचाय, योग्य कसा निवडाल; 1, 1.5, 2 टन, चुकलात तर चुकाल...

कंपनी कोणती निवडायची, किती टनचा एसी निवडायचा, कोणती फिचर्स हवीत...
अनेकांना एसी घ्यायची वेळ आली आहे. काहीजण पहिल्यांदाच एसी घेणार आहेत. ज्यांनी घेतलाय त्यानी जी चूक केली ती पुन्हा नव्या लोकांकडून होण्याची शक्यता आहे.
तुम्हीच तुमचा होमवर्क का करावा? कारण तुमचा वापर, उद्देश आणि तुमच्या रुमची साईज, तुम्ही एसी लावणार असलेली रुम किती काळ सूर्यप्रकाशात येते आदी अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो.
सर्वात पहिला विचार करायचा तो म्हणजे तुमच्या रुमची साईज आणि एसीची कॅपॅसिटी. १ टन, दोन टन, दीड टन किंवा ०.८ टन अशी कॅपॅसिटी असते.
कमी क्षमतेचा एसी मोठ्या रुमला निवडला तर त्याच्यावर थंड करण्यासाठी लोड येऊन तो खराब होऊ शकतो, शिवाय बिलही जास्त येते.
१ टनाचा एसी १२००० ब्रिटीश थर्मल युनिट्स ची कुलिंग कॅपॅसिटी प्रदान करतो. जो १०० ते १२० स्क्वेअर फुटच्या रुमसाठी योग्य आहे. बेडरुम असेल, ऑफिस केबिन किंवा स्टडी रुम यामध्ये बसतात.
हॉलसाठी एसी घ्यायचा असेल तर त्याच्या साईजनुसार दीड किंवा दोन टन एसी घ्यावा. १.५ टन म्हणजे १८००० बीटीयू क्षमता असते. १५० ते २०० स्केअरफुटच्या रुमसाठी या टनाचा एसी वापरू शकता.
एसी घेताना जास्त वापर असेल तर इन्व्हर्टर एसी घ्या. जो विजेचा खप कमी करतो आणि लाईट बिलावर जास्त परिणाम होत नाही.
इन्वर्टर एसी सामान्य एसीपेक्षा थोडा जास्त महाग असतो. मेन्टेनन्सही महाग जातो. याचा सारासार विचार करून एसी निवडावा.
स्टार रेटिंगही महत्वाचे असते. १ ते ५ स्टार रेटिंग असते. जेवढे जास्त स्टार तेवढी जास्त वीज बचत असते. इन्व्हर्टर आणि थ्री, फाईव्ह स्टार रेटिंग असेल तर तुमचे वीज बिल कमी येणार.
एसीसाठी काही चांगल्या कंपन्या आहेत. यामध्ये डायकेन, हिताची, पॅनासोनिक, ब्लू स्टार, ओ जनरल, कॅरिअर आदी कंपन्यांचे एसी चांगले परफॉर्म करतात.
क्लिक करा