भारतात कुठे तयार होतो इस्रायली पोलिसांचा युनिफॉर्म, माहितीये का?
इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तुम्हाला माहीत आहे का? इस्त्रायली पोलिसांचा युनिफॉर्म कुठे बनवला जातो.
इस्त्रायली पोलिसांचा युनिफॉर्म केरळमध्ये बनवला जातो. एवढंच नाही तर तेथील कैद्यांचे गणवेशही केरळमधील या कारखान्यात तयार केले जातात.
इस्रायल आणि हमास यांच्यात संघर्ष सुरू असताना केरळमधील कन्नूर येथील एका कपड्याच्या कारखान्यातील कर्मचारी एकजुटीने काम करत आहेत.
कन्नूरच्या कुथुपरंबा शहरातील मेरियन गारमेंट्स कारखाना गेल्या ८ वर्षांपासून इस्रायली पोलिसांसाठी गणवेश तयार करत आहे.
मेरियन गारमेंट्सचे एमडी थॉमस ओलिकल यांच्या मते, या कारखान्याला दरवर्षी १२ हजार ऑलिव्ह ग्रीन स्ट्रेच शर्ट आणि पँट असे युनिफॉर्म शिवण्याच्या ऑर्डर मिळतात.
या युद्धाच्या वातावरणात या कारखान्याला लवकरात लवकर गणवेश पाठवण्यास सांगण्यात आले आहे.
या कारखान्याचे मुख्यालय मुंबईत आहे. २०१५ पासून ही कंपनी वेगवेगळ्या देशांसाठी कपडे बनवते.
मेरियन गारमेंट्स दरवर्षी इस्रायलला अंदाजे १ लाख ४० हजार गणवेश शिवते आणि पुरवते.
यामध्ये १ लाख गणवेश पोलिसांसाठी तर २५ ते ४० हजार गणवेश कारागृहातील कैद्यांसाठी आहेत.
याशिवाय, या ठिकाणाहून कुवेत सुरक्षा दल, कतार सुरक्षा दल, सौदी अरेबिया, फिलिपिन्स इत्यादी देशांच्या लष्करी दलांना गणवेश पुरवले जातात.