कंपनीला विविध व्यावसायिक क्षेत्रात 1,005 कोटी रुपयांचे नवीन प्रकल्प मिळाले आहेत.
अभियांत्रिकी कंपनी केईसी इंटरनॅशनलला 1005 कोटी रुपयांचे अनेक प्रकल्प मिळाले आहेत. मंगळवारी कंपनीनं यासंदर्भातील माहिती दिली.
रेल्वे आणि केबलसह तिच्या विविध व्यावसायिक क्षेत्रात 1,005 कोटी रुपयांचे नवीन प्रकल्प मिळाल्याचं कंपनीनं म्हटलंय.
कंपनीचा शेअर मंगळवारी सकाळी 621.70 रुपयांवर उघडला आणि सकाळी 10 वाजेपर्यंत 626 रुपयांवर पोहोचला.
या शेअरनं यावर्षी 24.38 टक्के परतावा दिला आहे. तर, गेल्या एका वर्षात त्यात 46 टक्के आणि 2006 पासून 613 टक्क्यांचे रिटर्न दिलेत.
आरपीजी ग्रुपच्या या कंपनीला देशांतर्गत बाजारपेठेत तसेच मध्य पूर्व, युरोप, आफ्रिका आणि अमेरिकेत ट्रान्समिशन आणि वितरण, तसंच केबलिंगचे प्रकल्प मिळाले आहेत.
रेल्वे विभागात त्यांना 25 KV ओव्हरहेड इलेक्ट्रिफिकेशन (OHE) आणि संबंधित कामांसाठी ऑर्डर मिळाली आहे.
(टीप - यात शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकारांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)