काव्या मारन-आकाश अंबानी जोडीची एकमेकांना 'जादू की झप्पी'; फोटो व्हायरल
दक्षिण आफ्रिकेतील टी२० लीग दरम्यानचा खास सीन दाखवणारे फोटो चर्चेत
दक्षिण आफ्रिकेतील टीृ-२० लीगनंतर मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी आणि सनरायझर्स हैदराबादची मालकीण बाई काव्या मारन यांचे काही फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.
मुंबई इंडियन्स फ्रँचायझीची केपटाऊन आणि हैदराबाद फ्रँचायझीच्या ईस्टन केप यांच्यात फायनल लढत झाली. दोन वेळच्या विजेत्या ईस्टर्न केपला नमवत MI फ्रँचायझीच्या संघानं ट्रॉफी जिंकली. या लढतीनंतर काव्या मारन अन् आकाश अंबांनी यांची खास झलक दिसून आली.
आकाश अंबानी आणि काव्या मारन यांचे जे फोटो व्हायरल होत आहेत त्यातील एका फोटोत आयपीएलमधील फ्रँचायझी मालकांची जोडी एकमेकांची गळाभेट घेत असल्याचा सीनही दिसून आला.
आयपीएलमध्ये हे दोन्ही चेहरे आपापल्या फ्रँचायझी संघाला प्रोत्साहन देण्यासाठी स्टेडियममध्ये हजेरी लावतात. पण भारतीय मैदानात कधी या जोडीची एकत्र झलक पाहायला मिळाली नव्हती.
आयपीएलमध्ये वेगवेगळ्या स्टँडमध्ये बसणारे हे चेहरे दक्षिण आफ्रिकेत एकत्र आणि खेळीमेळीत एकमेकांसोबत गप्पा गोष्टी करताना दिसल्यामुळे सोशल मीडियावर या भेटीचे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.
दक्षिण आफ्रिका टी-२- लीगमधील काव्या मारनच्या मालकीच्या सनरायझर्स ईस्टर्न संघानं पहिल्या दोन हंगामात जेतेपद पटकावले होते. यावेळी तिच्या संघाला हॅटट्रिकची संधी होती. पण ते शक्य झालं नाही.
आकाश अंबानी यांच्या मुंबई फ्रँचायझी संघानं काव्या मारनच्या संघाची हॅटट्रिक रोखत तिसऱ्या हंगामात पहिल्यांदाच ट्रॉफी जिंकल्याचे पाहायला मिळाले. दोन संघातील महायुद्धानंतर मालकांमध्ये गोडी गुलाबीचा सीन पाहायला मिळाला.