कतरिना कैफ ही केवळ बॉलिवूडमधील उत्तम अभिनेत्रीच नाही तर यशस्वी महिला उद्योजिकादेखील आहे.
मुख्यतः तिच्या सौंदर्यप्रसाधन लाइन के ब्युटीच्या यशामुळे कतरिना कैफ चर्चेत आली आहे.
नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमामध्ये तिला तिच्या उद्योजकीय प्रवासाविषयी जागतिक स्तरावर प्रसिद्ध फॅशन उद्योगा बद्दल तिने खास गोष्ट सांगितली.
२०१९ मध्ये के ब्युटीचा दूरदर्शी प्रवास सुरू झाला आणि कतरिना कैफने या एक खास गोष्ट शेअर केली.
एक महिला उद्योजिका म्हणून तिच्या भूमिकेबद्दल बोलताना ती म्हणाली " व्यवसाय करण हे नक्कीच आव्हानात्मक आहे प्रेक्षक अभिनेत्री म्हणून जेवढं प्रेम करतात त्याहून तसच प्रेम ते माझ्या या भूमिकेला सुद्धा देतात.
व्यावसायिका ही भूमिका बजावून लोकांच्या पसंतीस ब्रँड येणं हा प्रवास माझ्यासाठी खास होता, असे कतरिना म्हणाली.
Kay Beauty गेल्या चार वर्षांपासून उत्तम पणे कार्यरत असलेला ब्रँड आहे याचा मला खूप अभिमान आहे, असे ती सांगते.
कतरिना कैफचे तिच्या उद्योजकीय प्रवासा सोबत अभिनय क्षेत्रांमध्ये ट्रेलब्लेझर म्हणून ओळखली जाते आणि म्हणून येणाऱ्या काळात ती अनेक नवनवीन प्रोजेक्ट्स मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.