Tap to Read ➤

संकष्ट चतुर्थी: ५ राशींवर गणपती कृपा, ३ राजयोगाने धनलाभ; शुभ दिवस!

संकष्ट चतुर्थीला ३ शुभ राजयोग जुळून येत आहेत. तुमची रास आहे का यात? पाहा
३० नोव्हेंबर २०२३ रोजी नोव्हेंबर महिन्यातील दुसरी संकष्ट चतुर्थी आहे. या दिवशी अनेक शुभ योग जुळून येत आहेत.
हे शुभ योग राजयोगाप्रमाणे फले देतात, असे म्हणतात. चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत असेल. शुक्र तूळ राशीत प्रवेश करत आहे.
सर्वार्थ सिद्धी योग, शुभ योग, शुक्ल योग आणि पुनर्वसू नक्षत्राचा शुभ मानला गेलेला संयोग जुळून येत आहे.
संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जुळून आलेल्या शुभ योगांचा ५ राशींना अतिशय उत्तम लाभ मिळू शकतो. गणेश कृपेने विघ्न दूर होऊ शकतात, असे म्हटले जात आहे.
वृषभ: फायदा होईल. भाग्याची साथ मिळेल. मौल्यवान वस्तू मिळू शकेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. चांगली बातमी मिळेल. कामात यश मिळू शकेल.
कर्क: शानदार दिवस. मनातील इच्छा पूर्ण होईल. आर्थिक लाभ शक्य. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना कामात यश मिळेल. नोकरदारांना सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल.
कन्याः सुखाचा दिवस. सामाजिक कार्यात सहभागाची संधी. सन्मान वाढेल. व्यवसायात लाभ. नोकरदारांना कामात यश. विद्यार्थ्यांना नवीन माहिती मिळेल.
तूळः शुभ फलदायी दिवस. विरोधकांना पराभूत कराल. भावंडांचे सहकार्य लाभेल. कौटुंबिक वातावरण आनंदी. मित्रामुळे नोकरीची नवी ऑफर मिळू शकेल.
मकर: नशिबाची साथ लाभेल. मेहनतीचे यथोचित फळ मिळेल. अडकलेला पैसा मिळू शकेल. कामाचे कौतुक होऊ शकेल. भागीदारी व्यवसायातून फायदा मिळू शकेल.
- सदर माहिती सामान्य गृहीतके, ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल.
क्लिक करा