Tap to Read ➤

"एका गाण्यासाठी 30 वेळा बदलले कपडे"; करिश्मा कपूर म्हणते...

"शूटिंगदरम्यान माझी अत्यंत वाईट अवस्था झाली होती"
'प्रेम कैदी'मधून करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री करिश्मा कपूरने 90 च्या दशकात सर्वांनाच वेड लावलं होतं.
अभिनेत्रीने हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक उत्तम चित्रपट दिले आणि प्रत्येक मोठ्या स्टारसोबत काम केलं.
करिश्माचा 'कृष्णा' हा चित्रपट 1996 मध्ये रिलीज झाला. ‘झांझरिया’ हे गाणंही खूप गाजलं.
गाण्यात करिश्मा आणि सुनील शेट्टीचे जबरदस्त डान्स मूव्ह आणि केमिस्ट्री पाहायला मिळाली.
या गाण्यात करिश्मा कपूरला एकदा दोनदा नव्हे तर 30 वेळा कपडे बदलावे लागले होते.
खुद्द अभिनेत्रीनेच याचा खुलासा एका मुलाखतीत केला आहे.
अभिनेत्रीने सांगितले की, "या गाण्यात तिने जितक्या वेळा कपडे बदलले तितक्या वेळा तिचा मेकअपही बदलला."
"झांझरिया हे गाणं मेल आणि फीमेल या दोन्ही व्हर्जनमध्ये चित्रित करण्यात आले आहे."
"शूटिंगदरम्यान माझी अत्यंत वाईट अवस्था झाली होती" असं देखील करिश्माने म्हटलं आहे.
क्लिक करा