Tap to Read ➤

"मला पर्वा नाही..."; करीना कपूरला सतावतेय वाढत्या वयाची भीती?

"मी माझ्या आयुष्यात नेहमीच प्रामाणिक राहिले, मग ते..."
बॉलिवूडची बेबो करीना कपूर खान सध्या तिच्या आगामी 'जाने जान' चित्रपटामुळे चर्चेत आहे.
बेबो या वयातही तिच्या सौंदर्याने आणि ग्लॅमरस लुकने लोकांना वेड लावते.
एकीकडे अभिनेत्री आपलं वय लपवण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब करत असताना, करीना हे आत्मविश्वासाने स्वीकारते.
करीना अनेकदा तिचा 'नो मेकअप' लूक सोशल मीडियावर शेअर करत असते.
हॅलो इंडियाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, अभिनेत्रीने खुलासा केला की ती तिचे वय मोठ्या अभिमानाने स्वीकारते.
ती 22 वर्षांची दिसण्याचा प्रयत्न करत नसल्याचंही तिने स्पष्ट केलं आहे.
"मी माझ्या आयुष्यात नेहमीच प्रामाणिक राहिले. मग ते लव्ह लाईफ असो किंवा माझ्या लग्नाबाबत."
"मी आता आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहे जिथे माझी फिगर झिरो आहे की नाही याने मला काही फरक पडत नाही."
"मी फक्त प्रत्येक गोष्टीत स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करते."
"मी कोणाशीही स्पर्धा करत नाही" असं देखील करीना कपूरने म्हटलं आहे.
करीनाचा जाने जान हा चित्रपट 21 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
क्लिक करा