Tap to Read ➤

जोश इंग्लिशचा पदार्पणात शतकी धमाका! धवनचा विक्रम थोडक्यात वाचला

एक नजर पदार्पणात जलद शतक झळकवणाऱ्या आघाडीच्या ५ फलंदाजांच्या खास रेकॉर्ड्सवर
या खेळीत त्याने पृथ्वी शॉसह ड्वेन स्मिथचा पदार्पणात सर्वात जलद शतक झळकवण्याचा विक्रम मोडला. पण धवनचा विक्रम मोडणं त्याला जमलं नाही.
इथं एक नजर टाकुयात कसोटीतील पदार्पणात सर्वात जलद शतक झळकवणाऱ्या आघाडीच्या पाच फलंदाजांवर
कसोटी पदार्पणात सर्वात जलद सेंच्युरी झळकवण्याचा विक्रम भारताचा माजी क्रिकेटर शिखर धवनच्या नावे आहे. २०१३ मध्ये मोहालीच्या मैदानात धवननं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यातून पदार्पण करताना ८५ चेंडूत शतक झळकावले होते.
या यादीत आता जोश इंग्लिस दुसऱ्या स्थानावर पोहचलाय. श्रीलंकेविरुद्धच्या गाले कसोटीत त्याने ९० चेंडूत शतक साजरे केले.
ड्वेन स्मिथनं २००४ मध्ये केपटाउनच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पदार्पणाचा सामना खेळताना ९३ चेंडूत शतक झळकावले होते.
पदार्पणात सर्वात जलद शतक झळकवणाऱ्या आघाडीच्या पाच बॅटरमध्ये पृथ्वी शॉ चौथ्या स्थानावर आहे. त्याने २०१८ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात ९९ चेंडूत शतक साजरे केले होते.
इंग्लिश बॅटर मॅट प्रायर याने २००७ मध्ये लॉर्ड्सच्या मैदानात पदार्पणाचा सामना खेळताना वेस्ट इंडिज विरुद्धच्या सान्यात १०५ चेंडूत शतक झळकावले होते.
क्लिक करा