रुटनं मोडला द्रविडचा विक्रम; कमी डावात ३६ शतकं झळकवणारे ५ फलंदाज
शतकांचा बादशहा सचिन तेंडुलकर या यादीत कितव्या स्थानावर माहितीये?
न्यूझीलंड विरुद्धच्या शतकी खेळीसह इंग्लंडचा स्टार बॅटर जो रूटनं कसोटीत आणखी एक विक्रम प्रस्थापित केला.
कसोटीत सर्वात कमी डावात ३६ शतके झळकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याने द्रविडला मागे टाकले.
इथं एक नजर टाकुयात सर्वात कमी डावात कसोटीत ३६ शतकांचा डाव साधणाऱ्या आघाडीच्या ६ फलंदाजांवर
राहुल द्रविडनं हा शतकी पल्ला गाठण्यासाठी २७६ डाव खेळले होते.
जो रुटने २७५ डावात ३६ वे कसोटी शतक साजरे करण्याचा डाव साधला आहे.
दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू जॅक कॅलिस याने कसोटीतील २३९ डावात ३६ शतके झळकावली होती.
मास्टर ब्लास्ट सचिन तेंडुलकरनं २१८ डावात हा पल्ला गाठला होता. कसोटीत सर्वाधिक ५१ आणि आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक १०० शतकांचा विक्रम सचिनच्या नावे आहे.
श्रीलंकेचा स्टार बॅटर कुमार संगकारा याने २१० डावात कसोटीत ३६ शतके झळकावली होती.
ऑस्ट्रेलियन रिकी पाँटिंग हा सर्वात कमी डावात ३६ शतके झळकावणारा फलंदाज आहे. त्याने २०० डावातच हा पल्ला गाठला होता.