Tap to Read ➤

Jio, Zepto सह लवकर 'हे' ५ IPO येण्याच्या तयारीत; पटापट चेक करा डिटेल्स

गुंतवणूकदार आता २०२५ मध्ये येणाऱ्या हाय-प्रोफाईल आयपीओची वाट पाहत आहेत.
२०२४ मध्ये विक्रमी कमाई आणि प्रमुख लिस्टिंगनंतर गुंतवणूकदार आता २०२५ मध्ये येणाऱ्या हाय-प्रोफाईल आयपीओची वाट पाहत आहेत. पाहूया कोणते आयपीओ येण्याच्या तयारीत आहेत.
टाटा कॅपिटल - टाटा समूहाची बिगर बँकिंग वित्तीय सेवा उपकंपनी टाटा कॅपिटल लवकरच आपला आयपीओ लाँच करण्याची शक्यता आहे. त्याची साईज सुमारे १५,००० कोटी रुपये असू शकते.
रिलायन्स जिओ - रिलायन्स जिओ इन्फोकॉम २०२५ च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत आयपीओ लाँच करण्याची योजना आखत आहे. हा आयपीओ भारतातील सर्वात मोठा आयपीओ असू शकतो. याची साईज ४० हजार कोटी असण्याची शक्यता आहे.
एनएसडीएल - देशातील आघाडीची डिपॉझिटरी फर्म नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) देखील लवकरच आपला आयपीओ जाहीर करण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार, कंपनी सुमारे ३,००० कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहे.
एलजी इलेक्ट्रॉनिक्स - दक्षिण कोरियन कंपनी एलजी इलेक्ट्रॉनिक्स भारतात आपल्या उपकंपनीसाठी आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. याची साईज १५,००० कोटी रुपये असू शकते.
जेएसडब्ल्यू सिमेंट - जेएसडब्ल्यू समूहाची सिमेंट शाखा जेएसडब्ल्यू सिमेंट देखील ४,००० कोटी रुपयांचा आयपीओ आणण्याची योजना आखत आहे.
झेप्टो - झपाट्यानं वाढणारा क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म झेप्टो २०२५ मध्ये आयपीओ आणून ७,००० ते ८,८०० कोटी रुपये उभे करू शकतो.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
क्लिक करा