तर बीएसईवर जिओ फायनान्शिअलचा हा शेअर २३२.७० रुपयांच्या स्तरावर पोहोचला. मंगळवारीही शेअरमध्ये अपर सर्किट होतं.
दरम्यान, या स्टॉकमध्ये ब्लॉक डील झाली, ज्यामध्ये ०.८ टक्के इक्विटी शेअर्सचा व्यवहार झाला.
Jio Financial Services च्या शेअर्समध्ये ही तेजी ब्लॉक डिलच्या वृत्तानंतर दिसून आली.
मंगळवारी Jio Financial Services चा ट्रेडिंग व्हॉल्युम ९.२ कोटी शेअर्सचा होता. ही ब्लॉक डिल अशावेळी झाली जेव्हा रिलायन्सच्या एजीएममध्ये ही कंपनी इन्शुरन्स क्षेत्रात उतरणार असल्याचं सांगण्यात आलं.
जेएफएस आणि ब्लॅक रॉक भारतात डिजिटल फर्स्ट इन्व्हेस्टमेंट सोल्युशन सादर करणार असल्याची माहिती ब्लॅक रॉकचे सीएफओ लॅरी फिंक यांनी दिली.
२१ ऑगस्ट रोजी कंपनी शेअर बाजारावर लिस्ट झाली होती. रिलायन्सच्या शेअर होल्डर्सना रिलायन्सच्या एका शेअरच्या मोबदल्यात जेएफएसचा एक शेअर देण्यात आला.
लिस्टिंगनंतर कंपनीच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री दिसून आली. परंतु एजीएमनंतर यात मात्र रिकव्हरी दिसून येतेय.