Tap to Read ➤
Jio चा स्वस्त प्लॅन, 5G डेटा आणि मोफत Netflix; एअरटेल, Vi ला टक्कर
दूरसंचार कंपन्या ग्राहकांची पसंती लक्षात घेऊन अनेकदा स्कीम्स तयार करत असतात.
दूरसंचार कंपन्या ग्राहकांची पसंती लक्षात घेऊन अनेकदा स्कीम्स तयार करत असतात. यामध्ये रिलायन्स जिओ अनेकदा एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाच्या पुढे असते.
जिओचा 1099 रुपयांचा प्लॅन हे याचे उत्तम उदाहरण आहे. या प्लॅनमध्ये कंपनी यूजर्सना मोफत Netflix आणि Jio Cinema सोबत अमर्यादित 5G डेटा देत आहे.
जर आपण Airtel बद्दल बोललो तर कंपनीचा 1499 चा प्लान Netflix ऑफर करतो.
दुसरीकडे, Vodafone-Idea चा Netflix सोबतचा तुर्तास कोणतीही प्लॅन नाही. तसेच, या युझर्सना सध्या 5G इंटरनेट स्पीडही मिळत नाही.
जिओच्या 1099 रुपयांच्या प्लॅनमध्ये 84 दिवसांसाठी दररोज 2 जीबी डेटा, अनलिमिटेड 5G, अनलिमिटेड कॉलिंग, 100 एसएमएससह जिओ टीव्ही आणि जिओ सिनेमाचाही अॅक्सेस मिळतो.
एअरटेलच्या 1499 रुपयांच्या प्लॅनमध्ये 84 दिवसांसाठी दररोज 3जीबी डेटा, अनलिमिटेड 5जी अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएससह नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन मिळतं.
Vi च्या 1066 रुपयांच्या प्लॅनमध्ये रोज 2 जीबी डेटा, दररोज 100 एसएमएस, अनलिमिटेड कॉलिंग, बिंज ऑल नाईट, वीकेंड डेटा रोलओव्हर, डेटा डिलाइट्स आणि Vi Movies & TV अॅपचं अॅक्सेस मिळतं. शिवाय एका वर्षासाठी डिस्ने + हॉटस्टारचंही सबस्क्रिप्शन मिळतं.
क्लिक करा