जेमिमाचा साडीतील Look! कमेंट आली 'त्या' ड्रेसमध्ये तू लयच भारी दिसतेस
जेमिमा रॉड्रिग्सच्या फोटोवर लाइक्स कमेंट्सची 'बरसात', एक कमेंट ठरली सर्वात लक्षवेधी
भारतीय महिला संघातील स्टार खेळाडू जेमिमा रॉड्रिग्स क्रिकेटच्या मैदानातील कामगिरीशिवाय आपल्या फॅशनेबल अंदाजानेही चर्चेत असते.
अनेकदा ती हॉट अँण्ड ब्यूटीफुल फोटोसह चाहत्यांचे लक्षवेधून घेते.
सोशल मीडियावरील तिच्या फोटोंवर लाईक्स अन् कमेंट्सची बरसात करत चाहते प्रेमाची बरसात करतानाही पाहायला मिळते.
आता बीसीसीआयच्या खास कार्यक्रमातील तिचा साडीतील लूक चर्चेचा विषय ठरत आहे. जेमिमानं सोशल मीडियाच्या माध्यमातून ब्लॅक साडीतील हॉट अँण्ड ब्युटीफूल लूकची झलक शेअर केली आहे.
तिच्या साडीवरील लूकवर अनेक प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळाले. यात एका नेटकऱ्याची कमेंट अधिक लक्षवेधी ठरते. साडीतील लूक भारी आहे, पण त्या ड्रेसमधील तोरा लयच भारी अशा आशयाची कमेंट एका सोशल मीडिया वापरकर्त्याने केली आहे.
तो ड्रेस कोणता याचा थेट उल्लेख या कमेंटमध्ये दिसत नाही. पण तिचा इंडियन जर्सीतील रुबाब सर्व ड्रेसअपसमोर फिका वाटतो, असाच काहीसा अर्थ या कमेंट्सचा होतो.
टीम इंडियाच्या जर्सीतील जेमिमाच अंदाजही एकदम खास असतो. या ड्रेसपमधील लूकमध्येही ती आपल्यातील खास कला सादर करताना दिसली आहे. बॅटची गिटार करून ती संगीत प्रेमाची झलक दाखवताना पाहायला मिळाले आहे.