Tap to Read ➤

बॉक्स ऑफिसवर 'Jawan'चे वादळ; पहिल्याच दिवशी जमवला 100 कोटींचा गल्ला...

Jawan Collection: शाहरुखच्या 'जवान'ने सनी देओलच्या 'गदर-2' आणि 'पठाण'लाही मागे टाकले आहे.
Jawan Collection: शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित 'जवान' चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे.
चित्रपट पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. जवानाचे अॅडव्हान्स बुकिंग 1 सप्टेंबरपासून सुरू झाले आणि तेव्हापासून चाहते तिकीट बुकिंगवर तुटून पडले.
पहिल्याच दिवशी 'जवान'ने बंपर कमाई केली आहे. शाहरुख खानच्या 'जवान'ने सनी देओलच्या ओपनिंग डेच्या बाबतीत 'गदर-2' ला मागे टाकले आहे.
'जवान'मध्ये शाहरुख खान 5 वेगवेगळ्या अवतारांमध्ये दिसला आहे. चित्रपट हिंदीसह तमिळ आणि तेलुगू भाषांमध्येही प्रदर्शित झाला आहे. दक्षिणेत चित्रपटाची मोठी क्रेझ आहे.
सॅकनिल्‍कच्‍या रिपोर्टनुसार, 'जवान'ने सर्व भाषांमध्‍ये 75 कोटींहून अधिक कमाई केली आहे. तर, जगभरातील कलेक्शन 120 कोटींच्या जवळपास आहे.
शाहरुख खानने स्वतःच्या 'पठाण' चित्रपटाचा विक्रम मोडला आणि पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. 'पठाण'ने पहिल्या दिवशी 57 कोटींचा व्यवसाय केला होता.
'जवान'ने सनी देओलच्या 'गदर 2' लाही खूप मागे टाकले आहे. 'गदर' ने पहिल्या दिवशी 40 कोटींची कमाई केली होती. 'जवान'ने पहिल्याच दिवशी अनेक मोठ्या चित्रपटांचा विक्रम मोडीत काढला आहे.
'जवान'चे दिग्दर्शन अॅटली कुमारने केले आहे. यात शाहरुखसोबत नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा, रिद्धी डोगरा, सुनील ग्रोव्हर महत्त्वाच्या भूमिकेत आहे. दीपिका पदुकोणने यात कॅमिओ केला आहे.
क्लिक करा