Tap to Read ➤

बघा जपानी लोकांचा वेटलॉस फॉर्म्युला, वजन उतरेल झरझर

जपानी लोकांची वेटलॉस करण्याची पद्धत अतिशय वेगळी असून ती वजनात खूप लवकर परिणाम दाखवणारी आहे.
त्यामुळे सध्या आपल्याकडेही जपानी वेटलॉस फॉर्म्युला जबरदस्त ट्रेण्डिंग असून अनेक जण तो फॉलो करत आहेत.
तुम्हालाही जपानी पद्धतीने वजन कमी करायचे असेल तर पुढील काही पथ्ये पाळा.
जपानी लोक सगळ्यात कटाक्षाने एक गोष्ट पाळतात. ती म्हणते ते कधीच पोट भरेपर्यंत खात नाहीत. त्यांना असणाऱ्या भुकेच्या ८० टक्केच ते आहार घेतात.
ते लोक जे आहार घेतात तो अगदी मोजून- मापून असतो. शिवाय ते खूप हळू आणि एकाग्रतेने जेवतात. जेणेकरून तुमच्या मेंदूला तुमच्या भुकेबाबत लगेच सिग्नल मिळतात. त्यामुळे ओव्हरइटिंग होत नाही.
त्यांच्या डाएटमध्ये ५० टक्के फायबर असतात. उरलेल्या भागात प्रोटिन्स, कार्बोहायड्रेट्स, व्हिटॅमिन्स आणि इतर पोषणमुल्ये असतात.
यासोबतच पुरेशा प्रमाणात पाणी पिऊन शरीर हायड्रेटेड ठेवा. स्नॅक्स, जंकफूड, प्रोसेस्ड ड्रिंक्समधून पोटात जाणारी साखर हे सगळं टाळा. तरच वेटलॉस होईल.
भुकेच्या ८० टक्के एवढंच जेवण्याची सवय जर नेहमीसाठी लावून घेतलीत तर तुमचं वजन नेहमीच आटोक्यात राहण्यास मदत होईल.
क्लिक करा