Tap to Read ➤

जेव्हा जान्हवीला बॉयफ्रेंडसोबत वडिलांनी पकडलं होतं रंगेहाथ...

अभिनेत्री जान्हवी कपूरने नुकत्याच एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला.
अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या आगामी सिनेमा ‘मिस्टर अँड मिसेस माही’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.
प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत जान्हवीने तिला बॉयफ्रेंडसोबत वडिलांनी रंगेहाथ पकडल्याचा एक किस्सा सांगितला.
एकेदिवशी जान्हवीला भेटायला एक मुलगा तिच्या घरी आला होता. मात्र त्या मुलाने पुढच्या दारातून घराबाहेर पडावं, अशी तिची इच्छा नव्हती.
वडिलांनी त्या मुलाला पाहू नये, म्हणून ती त्याला पहिल्या मजल्यावरून उडी मारायला सांगत होती.
जान्हवीच्या खोलीच्या खिडकीखाली कार होती. त्या कारवर उडी मारून खाली उतरायला त्याला सांगितले होते आणि त्याने तसं केलं.
मात्र हे सर्व माझ्या वडिलांनी सीसीटीव्ही कॅमेरामध्ये पाहिलं होतं. या घटनेनंतर त्यांनी माझ्या खिडकीला ग्रील लावून घेतली.
‘मिस्टर अँड मिसेस माही’ सिनेमात जान्हवीसोबत राजकुमार राव दिसणार आहे.
मिस्टर अँड मिसेस माही चित्रपट ३१ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
क्लिक करा