दोन देशांच्या युद्धादरम्यान का महाग होतंय सोनं? हे आहे कनेक्शन
सध्या सोन्या चांदीच्या दरातही वाढ होताना दिसतेय.
इस्रायल आणि हमास यांच्यात सध्या युद्ध सुरू आहे. यादरम्यान सोन्या चांदीच्या दरातही वाढ होताना दिसतेय.
पुढील काही दिवसांमध्ये सोन्याच्या किंमती वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
दोन देशांमध्ये जेव्हा युद्ध होतं, तेव्हा जगभरातील बाजारांवर त्याचा परिणाम होते. बाजारांवर परिणाम होण्यासोबतच इक्विटी मार्केटमध्येही घसरण होते.
अशात गुंतवणूकदार सुरक्षित मानल्या जात असलेल्या सोन्या चांदीत गुंतवणूक सुरू करतात. जर इक्विटीत नुकसान झालं, तर तोयातून भरून निघू शकतो. यामुळेच सोन्या चांदीच्या दरात वाढ होते.
सध्या सोन्या चांदीच्या दरातीव वाढीचं कारण भारतीय बाजारपेठेतील वाढता उत्साहदेखील आहे. सणासुदीच्या काळात लोक सोन्या चांदीच्या वस्तू खरेदी करतात. त्यामुळे त्यांची किंमत वाढते.
१५ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवाला सुरूवात होणार आहे. यासोबतच शुभ कार्य सुरू होतील आणि लोक खरेदीही करू लागतील.
यासोबतच धनत्रयोदशी, दिवाळी आणि लग्नकार्याचा सीझनही येणार आहे. त्यामुळे सोन्या-चांदीच्या दरात वाढ ही सामान्य आहे.