मंगळ ग्रहावर जीवन असू शकतं का?

माणसाला जगण्यासाठी हवा आणि पाण्याची गरज असते, त्यामुळे मंगळावर राहण्यासाठी पाण्याची गरज असते. 

मंगळ ग्रहावर जीवन असू शकेल का? याचं उत्तर शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी सर्वात आधी पाहिलं पाण्याचे अवशेष आहेत का?

NASA आणि ESA च्या मोहिमांनी दाखवलं की, मंगळावर पाण्याचे चिन्ह आहेत. पण ते आज नाही, तर भूतकाळात जास्त प्रमाणात होतं.

मंगळावर मोठमोठे दऱ्या-खोऱ्या वाळलेल्या नदीसारख्या दिसतात. यावरून स्पष्ट होतं की कधी काळी इथे नद्या वाहत असतील.

Mars Orbiter ने बर्फाचे प्रचंड साठे (Ice Caps) शोधले. उत्तर व दक्षिण ध्रुवावर बर्फाचे थर आहेत.

२०१८ मध्ये शास्त्रज्ञांनी subglacial lake (बर्फाखालील सरोवर) असल्याचा पुरावा दिला. हे जीवनासाठी मोठं संकेत मानलं जातं.

आजच्या मंगळावर द्रव पाणी फारसं नाही. वातावरण खूप पातळ आहे. त्यामुळे पाण्याचे लगेच बाष्पीभवन होतं किंवा गोठतं.

मीठाच्या खाऱ्या रेषा (Salty Streaks) काही ठिकाणी दिसतात. हे seasonal पाण्याच्या प्रवाहाचे चिन्ह असू शकतात.

जर मंगळावर सूक्ष्मजीव असतील, तर ते जमिनीखाली, बर्फाखाली किंवा खाऱ्या पाण्यात लपलेले असतील.

मंगळावर पाण्याचे पुरावे नक्की आहेत. पण जीवन आहे का? अजूनही हा मोठा प्रश्नचिन्ह आहे.

Click Here