Tap to Read ➤
कोरोनामध्ये सोशल वर्क करणाऱ्या मुलावर झाली IPS अधिकारी फिदा
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत झाली भेट, महिला अधिकाऱ्याने लग्नच केले
IPS रचिता जुयाल सध्या चर्चेत आहेत. नुकत्याच एका व्हिडिओमध्ये त्यांनी त्यांची प्रेमकहाणी शेअर केली आहे.
कसं सोशल वर्क करताना त्यांना यशस्वी जुयाल भेटला, ज्याच्या प्रेमात त्या पडल्या आणि नंतर त्यांच्याशी लग्न केले.
रचिता आणि यशस्वीचं गेल्या वर्षी लग्न झालं. यशस्वी हा फेसेम डान्सर, टेलिव्हिजन होस्ट राघव जुयाल याचा भाऊ आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रचिता आणि यशस्वी यांची भेट झाली. रचिताला सोशल वर्क करायला खूप आवडते.
अनेक NGO ला रचिता मदत करतेय. त्यावेळी यशस्वीसोबत तिची ओळख झाली. त्यानंतर कामातून दोघेही संपर्कात आले.
मला यशस्वी सर्वात बुद्धिमान वाटला. तो एनजीओच्या कामात नवीन होता, म्हणून मी त्याला जरा ग्रूम केले असं रचितानं म्हटलं.
यशस्वी हा कलाकार आहे हे कळल्यावर बोलणं वाढलं. कारण रचितालाही या क्षेत्राची खूप आवड होती.
बोलता बोलता रचिता आणि यशस्वी यांच्यात चांगली मैत्री झाली आणि नंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.
यशस्वीकडून शिकायला मिळतं. तो कोणाबद्दल वाईट बोलत नाही. सकारात्मक राहा असं रचिता सांगते.
रचिता जुयालने २०१५ मध्ये UPSC उत्तीर्ण केले. यानंतर ती आयपीएस झाली. तिचे वडीलही पोलीस खात्यात होते.
क्लिक करा