सनरायझर्स हैदराबादचा संघ मैदानात उतलरा की, काव्या मारनचा चेहरा चर्चेत येतोच. ती पुन्हा स्टँडमध्ये दिसली अन्...
आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादची मॅच असली की संघाची मालकीण काव्या मारन चर्चेत येणार नाही असं होणारच नाही.
आयपीएलच्या १८ व्या हंगामात हैदराबादच्या संघानं आपल्या घरच्या मैदानातून यंदाच्या हंगामाच्या मोहिमेला सुरुवात केली. यावेळी काव्या मारनही संघाला चीअर करण्यासाठी हैदराबादच्या स्टेडियमवर स्पॉट झाली.
काव्या मारनच्या स्टायलिश अंदाजातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
तिचा लूक बघून अनेकांना... "तेनु काला चश्मा जचदा ऐ जचदा ऐ गोरे मुखड़े ते" हे गाणंही आठवलं असेल.
गेल्या काही हंगामापासून आयपीएल स्पर्धेवेळी काव्या मारन हे नाव नेहमीच चर्चेत राहिले आहे. . यंदाच्या हंगामात पहिल्याच सामन्यात हा चेहरा दिसला अन् सोशल मीडियावर ब्युटी विथ ब्रेनचे फोटो व्हायरल होण्यास सुरुवात झाली.
या आधी दक्षिण आफ्रिकेतील टी-२० लीगमध्ये काव्या मारन आणि आकाश अंबानी यांचे फोटो चर्चेत राहिले होते. हा सीन आयपीएलमध्येही दिसणार का? तेही यंदाच्या हंगामात पाहण्याजोगे असेल.