Tap to Read ➤

IPL मधील अशा अँकर्स ज्यांनी बोल्ड अन् ब्युटीफुल अंदाजानं सोडलीये छाप

आयपीएल स्पर्धेवेळी आपल्या 'बोलंदाजी'सह आपल्या अदाकारीनं चाहत्यांना 'क्लीन बोल्ड' करणाऱ्या या अँकर्ससमोर अभिनेत्रींही ठरतील फिक्या
अर्चना विजया ही २०११ च्या आयपीएल हंगामात पहिल्यांदा अँकरिंग करताना दिसली होती. २०१५ च्या हंगामापर्यंत ती सातत्याने चर्चेत राहिल्याचे पाहायला मिळाले.
भारतातील पहिली महिला स्पोर्ट्स अँकर म्हणून ओळखली जाणारी मंदिरा बेदी ही पहिल्या दोन हंगामात सोनी मॅक्स टेलिव्हिजनवर अँकरिंग करताना पाहायला मिळाले होते.
भारताचा माजी क्रिकेटर स्टुअर्ड बिन्नीची पत्नी आणि बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष रॉजर बिन्नी यांची सून मयंती लँगर ही देखील आयपीएलमधील लोकप्रिय स्पोर्ट्स अँकरपैकी एक आहे.
रिधिमा पाठक हिनेही आयपीएल ब्रॉड कास्टिंग टीमसोबत काम करताना आपली खास छाप सोडल्याचे पाहायला मिळाले आहे.
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन ही देखील आयपीएल वेळी लक्षवेधी ठरणाऱ्या अँकरपैकी एक आहे. ती आपल्या 'बोलंदाजी'सह आपल्या अदाकारीनं लाखो क्रिकेट चाहत्यांना घायाळ करून सोडणारा चेहरा आहे.
२०२४ च्या हंगामातून आयपीएल अँकरिंगच्या रुपात पदार्पण करणारी साहिबा बाली सध्या चांगलीच चर्चेत असल्याचे दिसते.
आयपीएलमध्ये नशप्रीत कौर हिनेही आपल्या उत्साही अंदाजातील कव्हरेजनं लक्षवेधून घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. स्टायलिश अंदाजाने हा चेहराही  चर्चेचा विषय ठरला आहे.
रीना डिसूझा हिने देखील आयपीएलमधील प्रभावी सूत्रसंचाल करत क्रिकेट चाहत्यांमध्ये एक वेगळी छाप सोडली आहे.
क्लिक करा