Tap to Read ➤

श्रेयस अय्यर ते धोनी! IPL मध्ये सर्वाधिक मॅचेस जिंकणारे ६ कर्णधार

यंदाच्या हंगामात पंजाब किंग्जला धमाकेदार सुरुवात करुन देत श्रेयस अय्यरनं ऑस्ट्रेलियन क्रिकेटर वॉर्नरला मागे टाकले आहे. एक नजर अय्यरसह आयपीएलमधील यशस्वी कर्णधारांच्या खास रेकॉर्ड्सवर
एमएस धोनी हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. चेन्नई सुपर किंग्जला पाच वेळा चॅम्पियन करणाऱ्या धोनीनं १३३ सामने जिंकल्याचा रेकॉर्ड आहे.
या यादीत मुंबई इंडियन्सच्या संघाला पाच वेळा चॅम्पियन करणारा रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे. आयपीएलच्या इतिहासात रोहित शर्माच्या नावे ८९ सामने जिंकल्याचा विक्रम आहे.
गौतम गंभीरचाही या यादीत समावेश आहे. कोलकाता नाईट रायडर्सला दोन वेळा चॅम्पियन करणाऱ्या गंभीरनं आयपीएलमध्ये ७१ सामने जिंकले आहेत.
आरसीबीचे नेतृत्व करताना विराट कोहलीनं ६८ सामने जिंकले आहेत.
पंजाब किंग्ज आधी श्रेयस अय्यरनं दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स संघाचे नेतृत्व केले असून गुजरात टायटन्सविरुद्ध त्याने ४१ वा सामना जिंकत वॉर्नरला मागे टाकले आहे.
ऑस्ट्रेलियन स्टार डेविड वॉर्नरनं आयपीएलमध्ये कॅप्टन्सी करताना ४० सामने जिंकले आहेत.