असे ३ क्रिकेटर ज्यांना Mumbai Indians नं कधीच नाही केलं रिलीज
मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील स्टार खेळाडू
आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावाधी खेळाडूंना रिटेन रिलीज करण्याचा डाव रंगणार आहे.
मुंबई इंडियन्स हा लोकप्रिय संघ कुणाला रिटेन करणार अन् कुणाला रिलीज करणार याकडे अनेक क्रिकेट चाहत्यांच्या नजरा लागून आहेत.
एक नजर त्या ३ खेळाडूंवर ज्यांना ताफ्यात सामील करून घेतल्यावर मुंबई इंडियन्सनं त्यांना कधीच बाहेरचा रस्ता दाखवला नाही अशा खेळाडूंवर
ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू रिकी पाँटिंग २०१३ मध्ये मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सामील झाला. त्याच्याकडे संघाचे नेतृत्वही देण्यात आले. पण संघाची कामगिरी खराब झाली. त्याने कॅप्टन्सी सोडली. हा हंगाम संपल्यावर त्याने निवृत्ती घेतली होती. तो कोचच्या रुपात पुन्हा मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दिसला होता.
२००८ मध्ये डेक्कन चार्जसकडून IPL डेब्यू करणाऱ्या रोहित शर्माची २०११ मध्ये मुंबई इंडियन्समध्ये एन्ट्री झाली. २०१३ च्या हंगामात तो या संघाचा कॅप्टन झाला. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सनं विक्रमी पाच वेळा जेतेपद पटकावले.
२०२४ च्या हंगामात रोहितची कॅप्टन्सी गेली. पण तो संघासोबत कायम होता. आगामी तो संघात कायम राहणार की, मुंबई इंडियन्स त्याला रिलीज करणार ते पाहण्याजोगे असेल.
सचिन तेंडुलकर २००८ च्या पहिल्या हंगामात मुंबई इंडियन्सची कॅप्टन्सी करताना दिसला होता. २०१३ च्या हंगामात तो शेवटचा आयपीएल सामना खेळला. तोही MI कडून रिलीज न झालेल्या खेळाडूंपैकी एक आहे.