Tap to Read ➤

MS धोनीसोबत दिसणारी सुंदरी यावेळी मुंबई इंडियन्सला चीअर करणार, कारण...

महेंद्र सिंह धोनीची मोठी चाहती, CSK ला सपोर्ट करतानाही दिसली, पण यावेळी ती मुंबई इंडियन्सला चीअर करताना दिसेल. जाणून घ्या त्यामागचं कारण
एम एस धोनीसोबत दिसणारी ही तरुणी दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे मालती चाहर. IPL च्या मागील काही हंगामात सातत्याने ती चेन्नई सुपर किंग्सला चीअर करताना दिसली होती.
आयपीएल वेळी सोशल मीडियावर स्टायलिश अंदाजानेही ती लक्षवेधून घ्यायची. यावेळी तिचा असाच अंदाज पाहायला मिळेल.
आता तिचा हा फोटो बघा. क्रिकेट वरील प्रेम दाखवताना तिने येलो जर्सीची ओढ दाखवून देत CSK ची मोठी फॅन आहे हेच दाखवून देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते.
CSK च्या संघानं ट्रॉफी जिंकल्यावर ती उंचावतही तिने फोटो शेअर केला होता. जो चांगलाच व्हायरलही झाल्याचे पाहायला मिळाले.
मालती ही क्रिकेटर दीपक चाहरची बहिण आहे. त्यामुळेच तो चेन्नई कडून खेळताना तिचा तोरा येलो फिव्हरवाला दिसायचा.
पण यंदाच्या हंगामात ती चेन्नई विरुद्धच्या सामन्यातही मुंबई इंडियन्सला चीअर करताना दिसेल. कारण यावेळी दीपक चाहर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून खेळताना दिसेल.
याआधीही दीपक चाहर MI कडून खेळायचा त्यावेळी ती मुंबई इंडियन्सला सपोर्ट करताना दिसली आहे. पुन्हा तेच चित्र पाहायला मिळेल.
क्लिक करा