IPL च्या इतिहासात ४ ओव्हर्समध्ये सर्वाधिक धावा खर्च करणारे ६ बॉलर
जोफ्रा आर्चर आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात महागडा गोलंदाज ठरला आहे.
राजस्थानच्या ताफ्यातील जोफ्रा आर्चरनं २०२५ च्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध एकही विकेट न घेता ४ षटकात ७६ धावा खर्च केल्या.
भारताचा जलदगती गोलंदाज मोहित शर्मा याने गुजरात टायटन्सच्या ताफ्यातून खेळताना २०२४ च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात एकही विकेट न घेता ७३ धावा खर्च केल्या होत्या.
बासील थंपीनं सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना २०१८ च्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध ७० धावा खर्च करून विकेट लेस राहिला होता.
गुजरात टायटन्सच्या ताफ्यातून खेळताना यश दयाल याने २०२३ च्या हंगामात नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात ४ षटकात ६९ धावा खर्च केल्या होत्या.
रीस टोपली याने आरसीबीच्या ताफ्यातून खेळताना २०२४ च्या हंगामात सनरायझर्स विरुद्धच्या सामन्यात १ विकेट घेताना ६८ धावा खर्च केल्या होत्या.
लुक वूड याने मुंबई इंडियन्सकडून खेळताना २०२४ च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध १ विकेट घेत ४ षटकात ६८ धावा खर्च केल्याचा रेकॉर्ड आहे.