Tap to Read ➤

अक्षर पटेल आधी दिल्ली कॅपिटल्स संघाचे पंतसह 'डझनभर' कॅप्टन झाले, पण...

एक नजर दिल्ली कॅपिटल्सचे आतापर्यंतचे कर्णधार अन् त्यांच्या कॅप्टन्सीतील रेकॉर्डवर
अक्षर पटेल हा २०२५ च्या आयपीएल हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार झालाय.
अक्षर पटेल आधी दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचे पंतसह १२ कॅप्टन झाले. पण आतापर्यंत संघाला एकदाही ट्रॉफी जिंकता आलेली नाही.
'डझनभर' कर्णधारांना जे जमलं नाही ते करून दाखवण्याचं मोठं चॅलेंज अक्षर पटेलसमोर असेल. एक नजर दिल्ली कॅपिटल्सचे आतापर्यंतचे कर्णधार अन् त्यांच्या कॅप्टन्सीतील रेकॉर्डवर
वीरेंद्र सेहवाग हा दिल्ली संघाचा आयकॉन आणि कॅप्टन राहिला आहे. २००८ ते २०१२ या कालावधीत त्याने ५२ सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व केले. त्याच्या नेतृत्वाखाली संघानं २८ सामन्यात विजय मिळवला.
गौतम गंभीरही २००८ ते २०१२ या कालावधीत दिल्ली फ्रँचायझी संघाचा कॅप्टन होता. त्याच्या नावे २१ सामन्यात १० विजयाचा रेकॉर्ड आहे.
दिनेश कार्तिकनं २०१० ते २०१४ या कालावधीत ६ सामन्यात आयपीएलमधील दिल्ली फ्रँचायझी संघाचे नेतृत्व केले. यातील  २ सामन्यात संघाने  विजयाची नोंद केली.
जेम्स होप्स २०११ मध्ये ३ सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाचेन नेतृत्त्व करताना दिसला. पण यातील एकही सामना दिल्ली कॅपिटल्स संघानं जिंकला नाही.
महेला जयवर्धने याच्या कॅप्टन्सीत २०१२ ते २०१३ या कालवधीत संघाने १६ सामन्यात फक्त ४ विजय नोंदवले.
डेविड वॉर्नर याने २०१३ ते २०२३ या कालावधीत १६ सामन्यात संघाचे नेतृत्व केल्याचे पाहायला मिळाले. यात ५ सामन्यात संघाने विजय नोंदवला.
केविन पीटरसन याने २०१४ च्या हंगामात ११ सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व केले यात संघाला फक्त एक सामनाच जिंकता आला.
जेपी ड्युमिनी याने २०१५ ते २०१६ या कालावधीत १६ सामन्यात या संघाचे नेतृत्व केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने फक्त ६ सामनेच जिंकले.
झहीर खान याच्या नेतृत्वााखील २०१६ ते २०१७ या कालावधीत २३ सामन्यात दिल्लीच्या संघानं १० सामने जिंकल्याचा रेकॉर्ड आहे.
करुण नायरच्या नेतृत्वाखाली२०१७ च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं ३ सामन्यात २ विजय मिळवल्याची नोंद आहे.
श्रेयस अय्यरनेही २०१८ ते २०२० या कालावधीत ४१ सामन्यात दिल्ली संघाचे नेतृत्व केले. त्याच्या कॅप्टन्सीत संघाने २१ विजय मिळवले.
रिषभ पंत याच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघाने २०२१ ते २०२४ या कालावधीत ४३ सामन्यात २३ विजय नोंदवले.
क्लिक करा