केवळ १००० रुपयांत करा गुंतवणूक, मिळेल ७.७ टक्के व्याज
छोटी गुंतवणूकही तुमच्यासाठी मोठा फंड तयार करू शकते.
थेंबे थेंबे तळे साचे असं म्हणतात. तसंच छोटी गुंतवणूकही तुमच्यासाठी मोठा फंड तयार करू शकते. तुम्ही या स्कीममध्ये केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक सुरू करू शकता.
या गुंतवणूकीवर सरकारची हमी मिळते. सरकारनं ऑक्टोबर ते डिसेंबर २०२३ च्या तिमाहीसाठी ७.७ टक्क्यांच्या व्याजाची घोषणा केलीये.
या योजनेचं नाव नॅशनल सेव्हिंग स्कीम आहे. दर तिमाहिला सरकार यावरील व्याजाची घोषणा करते. परंतु हे व्याज मॅच्युरिटीवर मिळतं.
तुम्ही तुमच्या नजीकच्या पोस्ट ऑफिसमधून नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट खरेदी करू शकता. याचा मॅच्युरिटी कालावधी ५ वर्षे आहे.
एनएससीमध्ये गुंतवणूक केल्यास त्यावर टॅक्सची सूट मिळते. ८० सी अंतर्गत ही गुंतवणूक टॅक्स सुटीच्या अंतर्गत येते.
एनएससीवर गेल्या वर्षांमध्ये चांगलं व्याज मिळत होतं. जानेवारी ते मार्चमध्ये सरकारनं यावर ७ टक्के व्याज दिलं होतं.