Tap to Read ➤
जगात सर्वात जास्त तास काम करतो भारतीय; तरीही कमाई 'इतकी'च कशी?
एक भारतीय दर आठवड्याला किती तास काम करतो आणि किती कमावतो, वाचा
देशातील तरुणांनी दर आठवड्याला ७० तास काम करावे, जेणेकरून भारत वेगाने प्रगती करू शकेल असं नारायण मूर्तींनी म्हटलं.
इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या एका विधानावरून या '७० तासांच्या फॉर्म्युल्या'ची चर्चाही सुरू झाली
भारतातील पगारदार वर्ग आणि नियमित वेतन असलेले कर्मचारी आठवड्यातून ४८ तासांपेक्षा जास्त काम करतात.
गाव असो वा शहर महिलांपेक्षा पुरुष जास्त काम करतात. भारतीय जास्त काम करत असले तरी त्यांची कमाई फारशी नाही.
सरकारी रिपोर्टनुसार, भारतीयाचे सरासरी वार्षिक उत्पन्न १ लाख ७० हजार ६२० रुपये आहे. म्हणजेच दर महिन्याची कमाई १४ हजार
पगार मिळणाऱ्या भारतीयाची सरासरी मासिक कमाई २० हजार रुपये, हे असे लोक आहेत जे आठवड्यात जास्तीत जास्त तास काम करतात
रिसर्चनुसार, जर एखादी व्यक्ती आठवड्यातून ५० तासांपेक्षा जास्त काम करत असेल तर त्याची उत्पादकता कमी होऊ लागते.
वेगवेगळ्या प्रोफेशननुसार कामाचे तास कमी-अधिक असू शकतात. पण दिवसाला ६ तास कामाची मर्यादी हवी असं शास्त्रज्ञांचे मत आहे.
जास्त वेळ काम करणेदेखील आरोग्यासाठी धोकादायक आहे. २०१६ मध्ये, जास्त वेळ काम केल्यानं जगात ७ लाख लोकांचा मृत्यू झाला.
दिवसातून ५ तास काम करणे अधिक फायदेशीर असल्याचेही एका रिसर्चमधून समोर आलंय, ५ तास कामावर अधिक लक्ष केंद्रित होऊ शकतं
क्लिक करा