या भारतीय मुलींची आंतरराष्ट्रीय स्तरावर आहे चर्चा, जाणून घ्या कोण आहेत या...
कविता देवी ही WWE मध्ये जाणारी भारतातील पहिली महिला रेसलर होती. सलवार कमीज घालून लढणाऱ्या कविताचे खरे नाव कविता दलाल. कविता हरियाणा राज्यातून आली आहे.
२००९ मध्ये तिचे लग्न झाले आणि एका वर्षानंतर तिने एका मुलाला जन्म दिला. यावेळी कविताला कुस्ती सोडायची होती पण तिच्या पतीने तिला खूप साथ दिली. २०१७ ते २०२१ या कालावधीत तिने WWE मध्ये भाग घेतला.
सरिना संधू ही भारतीय वंशाची आहे. सरिनाने २०१५ मध्ये कुस्ती जगात प्रवेश केला. सरिना संधू कॅलिफोर्नियातील सॅन पाब्लो शहरातून आली आहे. सरिना संधू लहानपणापासूनच कॅलिफोर्नियामध्ये वाढली आहे.
सरिना संधू ही WWE मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करते. तिने WWE दिवा चॅम्पियन शार्लोट फ्लेअरसोबतही काम केले आहे. सरिना संधू सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
संजना जॉर्ज हिचा जन्म केरळमध्ये झाला. ती २ वर्षांपूर्वी WWE मध्ये पहिल्यांदा दिसली होती. वयाच्या १७ व्या वर्षी तिने मार्शल आर्ट्सच्या जगात प्रवेश केला होता. संजना लहानपणापासूनच WWE ची मोठी फॅन आहे.