तू फक्त नॅशनल क्रश नाहीस, तर... श्रेयंका पाटीलचा जलवा!
क्रिकेटच्या मैदानातील कामगिरीशिवाय ती सोशल मीडियावरील लोकप्रिय चेहरा ठरताना दिसतीये.
भारतीय महिला संघातील काही चेहरे क्रिकेटच्या मैदानातील आपल्या कामगिरीशिवाय फिल्डबाहेरील आपल्या अदाकारीनंही लक्षवेधून घेतात.
फिल्डबाहेर सौंदर्याची जादू दाखवत चाहत्यांना क्लीन बोल्ड करणाऱ्या महिला खेळाडूंमध्ये स्मृती मानधना, हरलीन देओलसह आता श्रेयंका पाटीलही आघाडीवर असल्याचे दिसून येते.
श्रेयंका पाटीलनं अल्पावधीत कमालीची लोकप्रियता मिळवली आहे. सोशल मीडियावर तिचा जलवा पाहायला मिळतो.
स्मृती प्रमाणेच श्रेयंका पाटील हिला देखील नॅशनल क्रशचा टॅग लागल्याचे पाहायला मिळाले. आता ती इंटरनॅशनल टॅगमुळे चर्चेत आलीये.
श्रेयंका पाटील हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून काही खास फोटो शेअर केले आहेत. तिच्या सौंदर्याची खास झलक पाहिल्यावर चाहते या फोटोंवर लाईक्स अन् कमेंट्सची बरसात करत आहेत.
यात काही कमेंट या ती फक्त नॅशनल क्रश नाही तर इंटरनॅशनल क्रश आहे, अशा आशयाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
श्रेयंका पाटील इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सातत्याने खास लूकमधील फोटो शेअर करताना दिसते.
तिचा स्टायलिश अंदाज अभिनेत्रींप्रमाणे कडक आणि आकर्षित करणारा ठरतो.