पृथ्वी शॉच्या कथित गर्लफ्रेंडनं शेअर केलेल्या फोटोत दडलीये खास स्टोरी
अभिनेत्रीनं चाहत्यांसोबत असा साजरा केला आनंद
पृथ्वी शॉ हा आपल्या पर्सनल लाईफमुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याचे नाव मॉडेल आणि अभिनेत्री निधी तपाडिया हिच्याशी जोडले गेले आहे.
गेल्या काही दिवसांपासून दोघांच्यात सुरु असलेल्या प्रेमाच्या खेळाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले आहे.
पण यावेळी क्रिकेटरच्या गर्लफ्रेंडनं शेअर केलेल्या सोलो फोटोंची चर्चा रंगताना दिसते.
निधीनं जे फोटो शेअर केले आहेत त्यात ती अगदी पारंपारिक अंदाजात नटल्याचे दिसते. गुलाबी साडी अन् लाली लाल लाल या तोऱ्यातील तिच्या फोटोत एक खास गोष्ट दडलीये. ले आहेत.
या फोटोला दिलेल्या कॅप्शनमधून तिच्या फोटोतील खास गोष्ट काय ते तुम्हाला सहज लक्षात येईल. नवं घर या कॅप्शनसह तिने नव्या घरात प्रवेश केल्याची गोष्ट चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
अभिनेत्रीने पूजा मांडल्याचा फोटोही सोशल मीडियावरून शेअर केल्याचे दिसते.