PICS : ६ डिसेंबर! ५ खेळाडूंचा जन्म अन् एक तर झोपेत चालणारा क्रिकेटपटू
भारतीय क्रिकेटसाठी आजचा दिवस खूप खास आहे.
कारण भारतासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या स्टार ५ खेळाडूंचा आज वाढदिवस आहे.
अष्टपैलू रवींद्र जडेजा आज त्याचा ३५वा वाढदिवस साजरा करत आहे. जड्डू सुरूवातीला रेल्वेने प्रवास करायचा तेव्हा तो रेल्वेच्या डब्ब्यातही चालेल अशी भीती त्याच्या दिवंगत आईला होती. याशिवाय तो झोपेतही चालायचा, असे त्याच्या बहिणीने सांगितले.
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ३१व्या वर्षात पदार्पण केले.
मुंबईकर श्रेयस अय्यर आज २९ वर्षांचा झाला.
कसोटी क्रिकेटमध्ये एकाच डावात ३०० धावा करणाऱ्या करूण नायरचाही आज वाढदिवस आहे.
पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यातून पदार्पण करणारा आरपी सिंह आज ३८ वर्षांचा झाला.