Tap to Read ➤

अभिनयासोबतच वेगळा व्यवसायही यशस्वीपणे करणाऱ्या अभिनेत्री!

काही बॉलीवूड अभिनेत्री यशस्वी उद्योजिका म्हणूनही प्रसिद्ध आहेत. त्या यादीत नेमक्या कोण येतात ते पाहूया..
कतरिना कैफ कॉस्मेटिक्स व्यवसायात असून तिचा Kay Beauty या सौंदर्य प्रसाधनांचा मोठा व्यवसाय आहे.
शिल्पा शेट्टी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स या टिमची सहमालक असून Swasthya हा तिचा वेलनेस ब्रॅण्डसुद्धा आहे.
अभिनेत्री प्रियांका चोप्राचं न्युयॉर्कमध्ये मोठं रेस्टॉरंट असून तिची स्वत:ची Purple Pebble Pictures ही चित्रपट निर्मिती कंपनी आहे.
Live Love Laugh Foundation या संस्थेची दीपिका पदुकोन संस्थापक असून तिची ही संस्था मानसिक आरोग्यावर काम करते. याशिवाय तिचा All About You हा फॅशन ब्रँडसुद्धा आहे.
अनुष्का शर्माची Clean Slate Filmz ही प्रोडक्शन कंपनी असून तिचा Nush हा ब्रॅण्डही प्रसिद्ध आहे.
सोनम कपूरसुद्धा फॅशन उद्योगात सक्रिय असून तिने तिच्या बहिणीसोबत म्हणजेच रिहा कपूरसोबत Rheson हा इंटरनॅशनल फॅशन ब्रॅण्ड सुरू केला आहे.
Dance with Madhuri ही माधुरीची ऑनलाईन डान्स अकॅडमी असून ती इतरही अनेक वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये सक्रिय आहे.
क्लिक करा