Tap to Read ➤

विजयाच्या आनंदात दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना विसरू नका! तेही खूप लढले

Photo: कालचा सामना अप्रतिम होता, फायनल कशी व्हावी... आफ्रिकावाले काही आपले दुश्मन नव्हते, तेही रडले...
२००७ नंतर भारताने थेट २०२४ मध्ये टी २० वर्ल्ड कप जिंकला. रोहितच्या नेतृत्वात यापूर्वीही भारत फायनलमध्ये गेला होता.
ऑस्ट्रेलियाने भारताला हरविले होते. आणखी एक कप येणार अशी आशा असताना रोहितसेना हरली होती.
यावेळी ऑस्ट्रेलिया विजयी उन्मादात होता, तर भारतीयांच्या डोळ्यात दु:खद अश्रू होते.
आज आनंदात भारतीय आहेत, तर दु:खात दक्षिण आफ्रिकावाले. द. आफ्रिका काही आपला दुश्मन नव्हता.
तो असा संघ होता ज्याने कित्येक दशके पात्र असूनही केवळ नशीब साथ देत नाही म्हणून पराभव स्वीकारलेला आहे.
अगदी भारतीय संघ बॅटींग करत असताना तो संघ लढत होता. संपूर्ण सामन्यावर त्यांनीच वर्चस्व गाजवले होते.
भारताचे खेळाडू एकामागोमाग एक तंबूत परतत होते. अगदी आफ्रिकेच्या फलंदाजीवेळीही त्यांनीच वर्चस्व ठेवलेले.
खूप लढले, आज ते जरी हरलेले असले तरी पुढच्यावेळी विजेते असू शकतात.
ते देखील रडले, फरक फक्त एवढाच होता, भारतीयांच्या डोळ्यात जे अश्रू होते ते आनंदाचे होते. त्यांचे दु:खाचे...