Tap to Read ➤

ब्रिफकेसपासून टॅबपर्यंत, असा आहे आजवरचा अर्थसंकल्पाचा प्रवास

देशाचा अर्थसंकल्प सादर होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत.
देशाचा अर्थसंकल्प सादर होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. अर्थमंत्री १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करतील. यावेळचा अर्थसंकल्प हा अंतरिम अर्थसंकल्प असेल.
अर्थसंकल्पाचा प्रवास खुप मोठा आहे. ब्रीफकेसपासून सुरू झालेला हा प्रवास आता टॅबवर आलाय.
इंग्रजांच्या काळापासून चामड्याच्या ब्रीफकेसमध्ये अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा सुरू होती. १८६० पासून हे सुरू होतं. ब्रिटनचे चान्सलर ऑफ द एक्सचेकर चीफ बिलियम एवर्ट ग्लॅडस्टन यांनी पहिल्यांदा भारताचा अर्थसंकल्प सादर केला होता.
अर्थसंकल्प मोठा असल्यानं त्यांना तो ठेवण्यासाठी बॅगेची गरज होती. पहिल्या अर्थसंकल्पाचे कागद एका मोठ्या ब्रीफकेसमध्ये आले आणि त्याला ग्लॅडस्टन बॉक्स असं नाव पडलं.
नंतर ती ब्रीफकेस खराब झाल्यानं ती म्युझियममध्ये ठेवण्यात आली आणि त्याची जागा रेड लेदर बॅगेने घेतली.
मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पाला भारतीय टच देण्यासाठी लाल ब्रिफकेसच्या ऐवजी लाल कपड्यात गुंडाळून आणण्यास सुरुवात केली.
२०१८ मध्ये त्यांनी यात थोडा बदल केला आणि टॅबच्या माध्यमातून त्यांनी अर्थसंकल्प सादर केला. हे डिजिटल इंडियाचं प्रतीक होतं.
क्लिक करा