Tap to Read ➤
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील ८ संघ अन् त्या संघाचे कर्णधार
२०१७ नंतर पुन्हा रंगणार मिनी वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार
२०१७ नंतर पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावण्यासाठी ८ संघ मैदानात उतरणार आहेत. ही स्पर्धेतील सामने पाकिस्तानसह दुबईत रंगणार आहेत.
इथं एक नजर टाकुयात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सहभागी असणारा कोणता संघ कुणाच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार त्यासंदर्भातील स्टोरी
भारतीय संघाने अद्याप चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी संघाची घोषणा केलेली नाही. पण रोहित शर्माच टीम इंडियाचे नेतृत्व करणार हे निश्चित आहे.
ऑस्ट्रेलियन संघ पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेत खेळताना दिसणार आहे.
यजमान पाकिस्तानच्या संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी मोहम्मद रिझवानच्या खांद्यावर असेल.
न्यूझीलंडचा संघ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत फिरकीपटू मिचेल सँटनरच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरल्याचे पाहायला मिळेल.
इंग्लंडचा संघाची कॅप्टन्सी स्टार विकेट किपर बॅटर जोस बटलरच्या खांद्यावर असेल.
बांगलादेशचा संघ मिनी वर्ल्ड कप समजली जाणाऱ्या या स्पर्धेत शान्तोच्या नेतृत्वाखालील खेळताना दिसेल.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाच्या कॅप्टन्सीची मदार ही टेम्बा बवुमा याच्यावर आहे.
अफगाणिस्तानचा संघ या स्पर्धेत हसमतुल्लाह शाहिदीच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसेल.
क्लिक करा