Tap to Read ➤

रचिन मोडला सचिनचा रेकॉर्ड; ICC स्पर्धेत सर्वाधिक शतकांचा पराक्रम

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत युवा रचिन रविंद्रची हवा, ५ शतकासह रचला खास विक्रम
न्यूझीलंडच्या संघानं दुसऱ्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत फायनल गाठली. या सामन्यात रचिन रविंद्रनं शतकी खेळी झळकावली.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या यंदाच्या हंगामातील दुसऱ्या शतकासह त्याने अनेक विक्रम आपल्या नावे केले. यात त्याने मास्टर ब्लास्टर सचिनचा मोठा विक्रम मोडीत काढल्याचे पाहायला मिळाले.
रचिन रविंद्र याने आतापर्यंत आपल्या वनडे कारकिर्दीत पाच शतके झळकावली आहेत. ही पाचही शतके त्याने आयसीसी स्पर्धेतच झळकावली आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी २०२३ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत त्याने ३ शतके झळकावली होती.
आयसीसी स्पर्धेत वयाच्या २५ व्या वर्षी सर्वाधिक ५ शतके झळकवण्याचा विक्रम आता रचिन रविंद्रच्या नावे झाला आहे. याआधी या बाबतीत तेंडुलकर आघाडीवर होता.
आंतरारष्ट्रीय क्रिकेटमधील  शतकांचा बादशहा सचिन तेंडुलकर याने वयाच्या २५ व्या वर्षांपर्यंत आयसीसी स्पर्धेत ३ शतके झळकवल्याचा रेकॉर्ड आहे.
रचिन रविंद्र हा भारतीय वंशाचा क्रिकेटर आहे. त्याच्या नावात द्रविड अन् सचिन यांच्या नावाचा संगम आहे. RA म्हणजे राहुल द्रविड आणि Chin म्हणजे असा त्याच्या नावाचा अर्थ आहे. या दोन नावाप्रमाणेच दमदार कामगिरी तो मैदानात करून दाखवताना दिसतोय.
क्लिक करा