Tap to Read ➤

बटलर किंग कोहलीच्या क्लबमध्ये; टी-२० त १२००० धावा करणारा ७ वा बॅटर

इथं एक नजर टी-२० क्रिकेटमध्ये १२ हजार धावांचा पल्ला गाठणाऱ्या ७ फलंदाजांच्या रेकॉर्ड्सवर
इंग्लंडचा कॅप्टन जोस बटलर यानं टीम इंडिया विरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात ६८ धावांची दमदार खेळी केली.
या खेळीसह त्याने टी-२० क्रिकेटमध्ये १२ हजार धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत एन्ट्री मारली आहे. अशी कामगिरी करणारा तो सातवा फलंदाज आहे. इथं एक नजर टाकुयात टी-२० क्रिकेटमध्ये १२ हजार धावांचा पल्ला गाठणाऱ्या ७ फलंदाजांच्या रेकॉर्डवर
जोस बटरलनं ४३० टी२० सामन्यात ८ शतके आणि ८४ अर्धशतकासर छोट्या फॉर्मेटमध्ये १२०३५ धावा आपल्या खात्यात जमा केल्या आहेत.
डेविड वॉर्नरनं ३९५ सामन्यात १२ हजार ७५७ धावा काढल्या आहेत. यात त्याच्या नेव ८ शतकांसह १०७ अर्धशतकांची नोंद आहे.
विराट कोहलीनं ३९९ सामन्यात १२८८६ धावा केल्या असून या कामगिरीत त्याने ९ शतकासह ९७ अर्धशतके झळकावली आहेत.
एलेक्स हेल्सनं ४८७ सामन्यात ७ शतके आणि ८३ अर्धशतकाच्या जोरावर १३३८४ धावा काढल्या आहेत.
केरॉन पोलार्डनं ६९२ टी-२० सामन्यात १ शतक आणि ६० अर्धशतकाच्या मदतीने १३४३४ धावा केल्या आहेत.
पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब मलिक याने ५५१ टी -२० सामन्यात ८३ अर्धशतकासह १३४९२ धावा काढल्या आहेत.
या यादीत ख्रिस गेल सर्वात टॉपला आहे. गेलनं ४६३ टी-२० सामन्यात २२ शतके आणि ८८ अर्धशतकाच्या मदतीने १४५६२ धावा ठोकल्या आहेत.