Tap to Read ➤

IND vs ENG : हार्दिक पांड्याला खुणावतोय खास विक्रम, जाणून घ्या सविस्तर

एक नजर आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक चेंडू फेकणाऱ्या भारतीय  गोलंदाजांच्या रेकॉर्ड्सवर..
इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत हार्दिक पांड्याला खास विक्रम खुणावत आहे. तिसऱ्या फक्त ३ ओव्हर गोलंदाजी करताच तो खास रेकॉर्ड आपल्या नावे करेल.
हार्दिक पांड्याला आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक चेंडू फेकण्याचा विक्रम आपल्या नावे करण्याची संधी आहे.
इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात फक्त तिसऱ्या ओव्हरमध्ये त्याला टॉपरचा टॅग लागू शकतो. इथं एक नजर भारताकडून आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक चेंडू फेकणाऱ्या गोलंदाजांच्या खास रेकॉर्ड्सवर
भुवनेश्वर कुमार १७९१ चेंडूसह भारताकडून सर्वाधिक चेंडू फेकणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत टॉपला आहे.
हार्दिक पांड्याने आतापर्यंत १७७५ चेंडू टाकले आहे. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत १७ चेंडू फेकताच तो भुवनेश्वरला मागे टाकून या यादीत अव्वलस्थानी पोहचेल.
भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल याने आंतरारष्ट्रीय टी-२० कारकिर्दीत १७६४ चेंडू फेकले आहेत.
भारतीय संघातील स्टार जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहनं आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये १५०९ चेंडू टाकले आहेत.
आर. अश्विन या यादीत १४५२ चेंडूंतील गोलंदाजीसह चौथ्या स्थानावर आहे.
क्लिक करा