Tap to Read ➤

IND vs BAN: हिटमॅन रोहित समोर 'टेन्शन फ्री' खेळण्याचे 'चॅलेंज'; कारण..

टीम इंडियाचा रेकॉर्ड भारी, कॅप्टन हिटमॅनचा टेस्टमध्ये दिसलाय फ्लो शो!
भारतीय संघ मोठ्या ब्रेकनंतर बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेतून पुन्हा मैदानात उतरणार आहे. १९ सप्टेंबरपासून चेन्नईच्या मैदानात भारत-बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना रंगणार आहे.
बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यातील टीम इंडियाचा रेकॉर्ड एकदम जबरदस्त आहे. १३ कसोटीतील ११ सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला आहे. तर दोन सामने अनिर्णित राहिले आहेत.
टीम इंडियाचा बांगलादेश विरुद्धच्या कसोटीतील रेकॉर्ड बेस्ट असला तरी कॅप्टन आणि हिटमॅन रोहित शर्मासाठी बांगलादेश कसोटी सामना चॅलेंजिंग असेल. आकडेच त्याचा पुरावा आहेत.
बांगलादेश विरुद्ध रोहित शर्मानं आतापर्यंत ३ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याच्या खात्यात फक्त ३३ धावा जमा आहेत.
रोहितनं बांगलादेश विरुद्ध पहिला कसोटी सामना २०१५ मध्ये फतुल्लाहच्या मैदानात खेळला होता. या सामन्यात त्याने ९ चेंडूत फक्त ६ धावा केल्या होत्या. शाकीबनं त्याला बोल्ड केले होते.
रोहित २०१९ मध्ये बांगलादेश विरुद्ध दुसरा कसोटी सामना खेळला. इंदुरच्या मैदानात रंगलेल्या या सामन्यात रोहितनं १४ चेंडूत ६ धावा केल्या होत्या. या सामन्यात अबू जायदनं त्याची विकेट घेतली होती.
रोहितनं बांगलादेश विरुद्धचा अखेरचा कसोटी सामना ईडन गार्डन्सच्या मैदानात खेळला. या सामन्यात ३५ चेंडूत २१ धावांत त्याचा खेळ खल्लास झाला होता. इबादत हुसैन याने या सामन्यात त्याची विकेट घेतली होती.
टेन्शन फ्री फलंदाजी करत खराब रेकॉर्ड सुधारण्याच्या इराद्यानेच रोहित शर्मा बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यात मैदानात उतरेल.
क्लिक करा