Tap to Read ➤
बुमराहनं खास 'फिफ्टी'सह मारली कपिल पाजी अन् झहीरच्या क्लबमध्ये एन्ट्री
अशी कामगिरी करणारा तिसरा भारतीय जलदगती गोलंदाज ठरला बुमराह
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅडिलेड कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी जसप्रीत बुमराहनं ऑस्ट्रेलियाची सलामी जोडी फोडत संघाला पहिलं यश मिळवून दिले.
उस्मान ख्वाजाची शिकार करताच जसप्रीत बुमराहनं खास 'फिफ्टी' साजरी केली. यंदाच्या वर्षातील त्याने घेतलेली ही ५० वी विकेट ठरली.
एका कॅलेंडर ईयरमध्ये अशी कामगिरी करणारा जसप्रीत बुमराह भारताचा तिसरा जलदगती गोलंदाज ठरला आहे.
जसप्रीत बुमराहनं या कामगिरीसह दिग्गज कपिल देव आणि झहीर खान यांच्या खास क्लबमध्ये एन्ट्री मारली आहे.
कपिल देव यांनी १९७९ आणि १९८३ मध्ये अनुक्रमे ७४ आणि ७५ विकेट्स घेत दोन वेळा अशा कामगिरीची नोंद केली होती.
२००२ च्या कॅलेंडर ईयरमध्ये झहीर खान याने ५१ विकेट्स घेतल्याचा रेकॉर्ड आहे.
क्लिक करा