Tap to Read ➤
या वर्षात कंपन्यांना हवेत फक्त १४ टक्के फ्रेशर्स...
फ्रेशर्सना केवळ १४ टक्के नोकऱ्या
भारतीय कंपन्या वर्ष २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये ११ टक्के अधिक नोकऱ्या देणार आहेत.
बेरोजगारांसाठी ही मोठी संधी असली तरी कॉलेजमधून नुकत्याच बाहेर पडलेल्या तरुणांसाठी आव्हानात्मक स्थिती आहे.
कारण या कंपन्यांना अनुभवी म्हणजेच किमान पाच वर्षांचा अनुभव असलेले कर्मचारी हवे आहेत.
तर नुकतेच शिक्षण पूर्ण केलेले फक्त १४ टक्के फ्रेशर्स कंपन्यांना हवे आहेत.
फ्रेशर्सना ३७ टक्के जॉब पोर्टल, ३२.५ टक्के इंटरनल रेफरल, १३ टक्के सोशल मिडिया, १० टक्के कॅप्सस प्लेसमेंट, ५ टक्के रिक्रूटमेंट एजन्सीमधून संधी आहे.
ऑटोमोबाईलमध्ये २१ टक्के, आयटीमध्ये २० टक्के, बीएसएफआय मध्ये २० टक्के, फार्मा हेल्थकेअरमध्ये ९ टक्के आणि उत्पादन क्षेत्रात ५ टक्के फ्रेशर्सना संधी आहे.
कंपन्यांना केवळ १४ टक्के फ्रेशर्स, १ ते ५ वर्षे अनुभव असलेले ४७ टक्के आणि ६ ते १० वर्षे अनुभव असलेले ३९ टक्के कर्मचारी हवे आहेत.
क्लिक करा