Tap to Read ➤
माझं लग्न झालं असलं तरी मी बाबरला विसरलो नाही - इमाम-उल-हक
शान मसूदच्या नेतृत्वात पाकिस्तानी संघ कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला आहे.
वन डे विश्वचषकानंतर पाकिस्तानी संघात काही बदल झाले असून बाबर आझमने कर्णधारपदाचा राजीनामा दिला.
सलामीवीर इमाम-उल-हकने अलीकडे त्याच्या मैत्रिणीसोबत लग्न केले.
इमामने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाताना बाबर आझमसोबत काही फोटो खेचले आणि पोस्ट करून भन्नाट कॅप्शन दिले.
"लग्न झालं असलं तरी मी बाबरला विसरलो नाही", असं इमामनं कॅप्शनच्या माध्यमातून म्हटलं.
इमामने त्याची प्रेयसी अनमोल महमूदसोबत विवाहगाठ बांधली.
२७ वर्षीय इमामने कसोटी क्रिकेटमध्ये ३८.७९च्या सरासरीनुसार १४७४ धावा केल्या आहेत.
क्लिक करा