Tap to Read ➤

तुमच्या मृत्यूनंतरही कुटुंबाचे मासिक उत्पन्न सुरू ठेवायचे असेल तर...

एखादी टर्म इन्शुरन्स पॉलिसी घेतली त्यांच्यावरून अवलंबून असलेल्या कुटुंबांची आर्थिक सुरक्षा सुनिश्चित होते, असं अनेकांना वाटत असतं.
नोकरदार तसंच व्यावसायिकांना वाटते की, एखादी टर्म इन्शुरन्स पॉलिसी घेतली त्यांच्यावरून अवलंबून असलेल्या कुटुंबांची आर्थिक सुरक्षा सुनिश्चित होते. परंतु हे केवळ अंशतः सत्य आहे.
या योजनेमुळे तुमच्या पश्चात मोठी रक्कम मिळू शकते. त्यातून तुम्ही घेतलेल्या कर्जाची किंवा अन्य मोठा खर्च भागवला जाऊ शकतो.
परंतु कुटुंबातील सर्व सदस्यांचं रोजचं खाणं-पिणं, विजेचं बिल, मालमत्ता कर, इंटरनेट, शिक्षण आणि प्रवासाचा मासिक खर्च आदीचं नियोजन कश करावं हा महत्त्वाचा प्रश्न कायमस्वरुपी उभा असतो.
पॉलिसीची निवड करतानाच या खर्चाचे नियोजनही करणे शक्य आहे. यातून मार्ग काढण्यासाठी मासिक पेआऊट असलेली टर्म इन्शुरन्स पॉलिसी घेता येते.
या पॉलिसीच्या अंतर्गत दावा रक्कम नियमित मासिक पेआऊटच्या स्वरूपात १० ते १५ वर्षांमध्ये कुटुंबातील सदस्यांना दिली जाते. ही मासिक रक्कम किती असावी याची निश्चिती पॉलिसी घेतेवेळी करता येते.
काही योजनांमध्ये यात दरवर्षी १० टक्के वाढही करतात. एखाद्या व्यक्तील्या कुटुंबाला कमी प्रीमियममध्ये दरमहा ५० हजार रुपये मिळू शकता. यासाठी ३० वर्षांच्या व्यक्तीला दरमहा कमीत कमी ४०० रुपयांचा प्रीमियम भरावा लागेल. विमा कंपनीच्या वेबसाइटवरून १० मिनिटात अशी पॉलिसी घेता येते.
क्लिक करा