U19 T20 World Cup : बॅटिंग-बॉलिंगमध्ये या भारतीय लेकींचा टॉप क्लास शो!
एक नजर अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावांसह सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या युवा महिला क्रिकेटर्सवर
अंडर १९ टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय महिला संघानं दिमाखात कामगिरी केल्याचे पाहायला मिळत आहे. बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही क्षेत्रात भारतीय ताफ्यातील पोरींनी धमक दाखवून दिली.
इथं एक नजर टाकुयात अंडर १९ टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वोच्च कामगिरीसह लक्षवेधून घेतलेल्या भारतीय संघातील खेळाडूंवर
यंदाच्या अंडर १९ टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा गोंगाडी त्रिशाच्या नावे आहे. फायनलआधी ६ सामन्यात तिने ६६ च्या सरासरीनं २६५ धावा आपल्या खात्यात जमा केल्या.
त्रिशा ही अंडर १९ टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत शतक झळकवणारी पहिली महिला क्रिकेटर ठरलीये. ११० धावांच्या शतकी खेळीसह तिने हा महापराक्रम करून दाखवला.
भारतीय संघाच्या डावाला सुरुवात करणारी जी कमालीनही सर्वाधिक धावि करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आघाडीच्या तीनमध्ये आहे. ६ सामन्यात तिने ४५ च्या सरासरीनं १३५ धावा केल्या. स्पर्धेत सर्वाधिक २ फिफ्टीची कामगिरीही तिच्या नावे आहे.
सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या बॉलर्सच्या यादीतही भारतीय छोरींचाच दबदबा दिसीन येते. वैष्णवी शर्मानं ५ सामन्यात १५ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत.
वैष्णवीच्या पाठोपाठ या स्पर्धेत आयुषी शुक्ला हिने सर्वाधिक १२ विकेट्स घेतल्या आहेत.